पुणे (ऑनलाइन हवेलीनामा) भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मंदिराचे दरवाजे उघडे करावे यासाठी राज्यभर शंंखनाद आंदोलन करण्यात आले. कोरोना संसर्गाची तीव्रता हळूहळू कमी होत असल्याने व्यापार बाजारपेठा सार्वजनिक वाहतूक रेस्टॉरंट माँल यास परवानगी देण्यात आली परंतु सर्वसामान्य नागरिकांचा भावनिक विषय असलेल्या धार्मिक स्थळांचा आणखी विचार करण्यात आला नाही.
पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन झाले आणि गणपती मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरासमोरही घंटानाद आंदोलन झाले नागपूर, औरंगाबाद येथील गजानन महाराज मंदिर, नाशिक येथील रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आले.
महाराराष्ट्रात धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे अनेक तीर्थक्षेत्र येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते परंतु कोरोना महामारीच्या प्रभावामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली त्यामुळे येथील आर्थिक गणित बिघडली सर्व प्रकारच्या अस्थापणाना परवानगी मिळाली आहे मग मंदिरे कधी उघडली जाणार याची येथील व्यापाऱ्यांना आस लागली आहे.मदिरालाय चालू तेथे होणारी गर्दी चालते मग मंदिर का बंद, कोरोनाचे निर्बंध कायम ठेवून ही परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे.
