पुणे (ऑनलाईन हवेलीनामा) अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथे पार पडलेल्या मेळाव्यात स्वराज्य संघ ,महाराष्ट्र राज्याच्या आध्यात्मिक आघाडीच्या राज्यप्रमुखपदी जगतगुरु संत तुकाराम महाराज चे १० वंशज ह.भ.प माणिक महाराज मोरे याची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प बाजीराव महाराज बांगर यांनी दिली.
आज स्वराज्य संघाच्या हवेली तालुका कार्यकारनीचा मेळावा संपन्न झाला.यामध्ये विजय खांदवे याची तालुका अध्यक्षपदी तसेच आध्यात्मिक तालुका अध्यक्ष पदी कैलास लोणकर याची निवड करण्यात आली व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
याशिवाय राज्य कार्यकारणी मध्ये सह सचिवपदी राजेश कान्हूरकर ,राज्य विस्तारकपदी सचिन कारले,सोशल मीडियाप्रमुख पदी निलेश सुकाळे ,पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी चे संपर्क प्रमुख विनोद जमधाडे याची निवड करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे यांनी केलं. स्वागत राज्यसंपर्क प्रमुख सचिन उढाणे यांनी केलं.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर व उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.आभार पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर यांनी मानले.सूत्रसंचालन लक्ष्मण चव्हाण यांनी केलं.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा चे पूजन तसेच शिव मानवंदना व शिवगर्जना करून करण्यात आली..कार्यक्रमाची सांगता शिव आरती व पसायदान याने करण्यात आली
