पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) इंडोनेशियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने इंडोनेशियातील २१ विद्यापीठे आणि १४ संस्थांसोबत सामंजस्य करार केले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्यासह इंडोनेशियन धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी, इंडोनेशियन विद्यापीठांचे डीन, डायरेक्टर आणि रेक्टर्स आणि इंडोनेशिया, भारत, इजिप्त, इराण, पाकिस्तान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, यूएसए इत्यादी आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेतर्फे (IWoE) आयोजित करण्यात आला होता. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ हॉलिस्टिक डेव्हल्पमेंट विभागाचे संचालक डॉ. अतुल पाटील आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातील इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि इंडोनेशियन धार्मिक व्यवहार मंत्रालय शिक्षण, संशोधन आणि विद्याशाखा विकास कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि वैज्ञानिक देवाण-घेवाण होईल. शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परस्पर हितसंबंधांचा विस्तार आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा मानस आहे.
डॉ. महेश चोपडे यांनी सांगितले की, “सामंजस्य करारामुळे इंडोनेशियातील २१ विद्यापीठ आणि १४ संस्थांसोबत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे शैक्षणिक संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल. या सामंजस्य कराराने मुल्यात्मक शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि सहयोगी उपक्रमांद्वारे विद्यापीठांमध्ये उच्च दर्जाचे आणि शाश्वत विकासासाठीच्या शिक्षण दिले जाईल, असा मला विश्वास आहे.
