थेऊर (हवेलीनामा प्रतिनिधी) लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून, एका अज्ञात पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या मयत व्यक्तीची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नसून, तिच्या वारसदारांचा किंवा नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी अधिकृत ‘शोधपत्रिका’ (Missed/Unidentified Person Notice) जारी केली आहे.

 

घटनेची व मयत व्यक्तीची सविस्तर माहिती – अकस्मात मयत नोंद क्र.: १०७/२०२६

दिनांक – ०४/११/२०२६

वय:अंदाजे ३५ वर्षे

वर्णन – पुरुष, वय अंदाजे ३५ वर्षे, राहण्याचा पत्ता व नाव सध्या पूर्णपणे अज्ञात आहे.

ओळख पटवण्यासाठी खूण – मयत व्यक्तीच्या हातावर “संदीप”आणि “ओम” असे नाव गोंदलेले (Tattoo) आहे.

 

पोलिसांचे नागरिकांना आवाहन –

 

मृत व्यक्ती कोणाच्याही परिचयाची असल्यास, किंवा तिच्याविषयी कोणतीही नातेवाईक अथवा वसाहतीची माहिती मिळाल्यास, कृपया तात्काळ खालील पोलीस अंमलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांकडून करण्यात आले आहे:

संपर्क – पोलीस अंमलदार जया शेळके: ७०६६०१८८१३,पो.कॉ. गणेश शेळके:** ९०२२७५८३४४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *