पुणे (ऑनलाइन हवेलीनामा) हिमालयाच्या हिमशिखरापैकी असलेल्या कांगयात्से शिखर मोहीम महाराष्ट्र पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी फत्ते केली त्यांनी ही मोहीम कोविड योध्याना समर्पित केली.
पुणे येथील दि अल्पायनिस्ट गिर्यारोहण संस्थेच्या वतीने लदाख मधील ६२५० मीटर उंच असल्याने कांंगयात्से शिखर मोहीम १९ गिर्यारोहकांच्या समूहाने एव्हरेस्ट वीर भगवान चावले यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतली यात महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनीही सहभाग घेतला तर यातील अनेक सदस्य हे नवखे होते हिमालयीन वातावरण अतिशय थंड जे उणे१८ इतके खाली असते अशा वातावरण शारीरिक व मानसिक संतुलन टिकविणे अतिशय अवघड असते क्रेपॉंन पॉइंट पर्यंत चा प्रवास दगडधोंड्यातील असल्याने खडतर होता.या गिर्यारोहकांपैकी केवळ भगवान चवले- (मोहिमेचा प्रमुख), शिवाजी ननवरे- पोलिस उपनिरीक्षक, सतीश घोडे, प्रसाद नगरकर, सुविधा कडलग, अजिंक्य बांगर, रोहित तिवारी हे सात जण समिट पर्यंत पोहोचले तर बाकीचे ५५०० मिटर पर्यंत चढाई करू शकले.समिट पर्यंत पोहोचण्यासाठी रोपवेचा वापर करावा लागला पहाटे ५:३० वाजता शेवटच्या टप्प्यात सुुरुवात झाली ती सकाळी साडेेेआत वाजता पुुर्ण झाली.
