हवेली (हवेलीनामा प्रतिनिधी): शालेय क्रीडा स्पर्धांच्या जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर आपले वर्चस्व कायम राखत, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय (National) शालेय कुस्ती स्पर्धेत (अंडर-१४) ‘शिवछत्रपती कुस्ती संकुल’च्या शिलेदाराने देशपातळीवर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मांजरी खुर्दच्या मातीतील ताकदीचा आणि कौशल्याचा एल्गार आता संपूर्ण देशात गाजला असून, या राष्ट्रीय स्पर्धेत संकुलाच्या सुवर्णकन्येने कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून ऐतिहासिक गरुडभरारी घेतली आहे.

राष्ट्रीय स्तरावर झळकलेले पदक व खेळाडूची माहिती

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत (अंडर-१४ फ्रीस्टाइल) ५४ किलो वजन गटात ही चुरशीची लढत झाली. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारी खेळाडू खालीलप्रमाणे आहे श्रीजल संतोष मुरकुटे हिने ५४ किलो वजन गट (अंडर-१४ फ्रीस्टाइल) प्रकारात राष्ट्रीय कांस्यपदक (National Bronze Medalist) पटकवले. ही मांजरी खुर्द येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल शाळेची विद्यार्थी आहे.

या यशामागे मार्गदर्शक व प्रशिक्षकांचे कठोर परिश्रम,खेळाडूची जिद्द फळाला आले आहेत. वस्ताद सत्यवान तात्या सावंत व कुस्ती कोच कांचन सनप यांचे कडक व शास्त्रोक्त प्रशिक्षण, तसेच संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ सावंत यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक कामगिरी साकारण्यात आली आहे.

मांजरी खुर्द येथील ‘शिवछत्रपती कुस्ती संकुल’च्या या सुवर्णकन्येच्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे, तिच्या शाळेचे, कुस्ती संकुलाचे व पालकांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन केले जात असून, तिच्या पुढील उज्ज्वल क्रीडा प्रवासासाठी अनेкаनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *