थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) धुणे वाळत टाकण्यासाठी असलेल्या लोखंडी तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने बसलेल्या विद्युत धक्क्याने एका विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे थेऊर परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सीमा विकास नरुटे वय 40 वर्ष रा. थेऊर असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव असून ही महिला पती आणि दोन मुले यांच्यासह थेऊर येथे चिंतामणी विद्यामंदिर मागील बाजूस राहत होती. घराच्या बाजूला असलेल्या लोखंडी कुंपणाला त्यांच्या बाजूस असलेल्या एका विकासाकाने अवैधरित्या वीज जोड घेऊन तेथील कोपनलिकेत विद्युत पंप चालवला जात होता. त्या पंपासाठी लागणारा वीजपुरवठा नरोटे यांच्या घरा पाठीमागील वीजवाहक तारेवर अवैध जोड करून त्याचा बॉक्स नरोटे यांच्या कुंपणावर बसविण्यात आला होता. पुरवठा करणारी वायर घर्षण झाल्याने मोकळी होऊन विज पुरवठा त्या कुंपणात विज प्रवाह प्रवाहित झाला त्याच कुंपणाला धुणे वाळविण्यासाठी असलेली तार बांधण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा करंट लागून त्या जागीच कोसळल्या. घरात कोणीच नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. तब्बल जवळपास दोन तासाने त्यांचा मुलगा शाळेतून घरी आला त्याने आपल्या आईची ही स्थिती पाहुन घाबरून शेजारच्या माणसांना बोलावले सुदैवाने त्याने आपल्या आईला जाऊन भेटला नाही कारण त्यांच्या अंगात विज प्रवाह चालूच होता.

यावर उपस्थितानी महावितरण कर्मचाऱ्यांना कळवले त्यांनी विज प्रवाह बंद केला. आणि थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथे स्थानिकाच्या मदतीने रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्यांनी त्या मृत असल्याचे घोषित केले.

थेऊर येथे गेल्या दोन महिन्यात विद्युत करंट बसल्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. यात महावितरण कडून काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे आहे. दोन महिन्यापूर्वी असेच एका कंत्राटी विज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता त्यावर अद्याप काय कारवाई झाली हे जाहीर नाही. दोषी कोण होते त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील स्पष्ट झालेले नाही.

या ताज्या घटनेत देखील महत्वपूर्ण असलेल्या मुद्यानुसार हे अवैध विज जोड महावीतरण कर्मचाऱ्यांच्या नजरेत कसे आले नाही हा कळीचा मुद्दा आहे. विज चोऱ्या रोखण्यात महावितरण कमी पडत की हेतूपूरस्सार दुर्लक्ष करते हा देखील प्रश्न अधोरेखित आहे. जे ग्राहक नियमित विज बिल भारतात त्यांच्यावर हा भुर्दंड बसतो. गावात कार्यालयीन कामकाजसाठी एक अधिकाऱ्यासह एक लाईनमन, पाच विद्युत सहाय्यक आहेत.आणि बाह्यश्रोत यांची देखील नियुक्ती आहे, असा कर्मचारी वर्ग असताना विज चोरीवर प्रतिबंध घालण्यात अपयश कसे असा सर्वसामान्य ग्राहकांचा प्रश्न आहे.वरिष्ठ अधिकारी यांनी या घटनेनंतर कर्मचाऱ्यांचा कार्य अहवाल मागवून नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या जातात याची खतर्जमा करावी.

या घटनेस जबाबदार असणारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.घटनास्थळी लोणी काळभोरचे प्रभारी पोलीस निरीक्षक पवार यांनी भेट दिली असून त्यांनी आपल्या सहकार्यांना घटनेच्या संदर्भात शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

महावितरणकडून सर्व माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आली असून विद्युत निरीक्षक या ठिकाणी भेट देऊन जबाबदारी निश्चित करेल. त्यामुळे विद्युत निरीक्षक काय अहवाल देतील हे लवकरच कळेल. या सर्व घटनेकडे हवेलीनामा लक्ष ठेऊन असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *