अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सातारा येथील सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता विजय कृष्णराव उर्फ बाळासाहेब देशमुख (६८) यांचे प्रदीर्घ आजारानंतर सातारच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीमध्ये कोणतेही धार्मिक विधी न होता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी उज्वला , मुलगा वैभव व सुन असा परिवार आहे.
कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता या पदावर त्यांनी काम केले आहे. डोंबिवली, बारामती , सातारा , वारणानगर , सातारा या ठिकाणी त्यांनी वीज वितरण कंपनीमध्ये काम केले आहे. सबोर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेचे ते सक्रिय नेते व संघटक होते.
सातारचे स्मृतीशेष लोकप्रतिनिधी अभयसिंहराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक होते. दिलखुलास व उमदे व्यक्तिमत्व असलेल्या बाळासाहेब देशमुख यांनी अनेक सामाजिक संघटनांना व संस्थांना नेहमी सहकार्य केले. ते न्यू इंग्लिश स्कूल सातारचे माजी विद्यार्थी होते.
