पुणे (हवेलीनामा) बारामती एम. आय. डी. सी.एस टी डेपोचे वाहतूक नियंत्रक व एस. टी. को-ऑपरेटिव्ह बैंक लिमिटेड, मंबई चे संचालक अनिल तुकाराम बनकर सहा लाख रुपयाची लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी ACB ने केलेल्या कारवाई कारवाईत रंगेहात सापडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अनिल तुकाराम बनकर, वय 51 वर्षे, व्यवसाय नोकरी, पद-वाहतूक नियंत्रक नेमणूक- बारामती एम. आय. डी. सी. डेपो तसेच संचालक एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई (वर्ग 3), रा. ठी. मु. पो. पणदरे, तालुका बारामती, जिल्हा-पुणे.यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी दिनांक 20/07/2026 रोजी ACB कडे तक्रार दिली की, त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई यांचे बारामती शाखेचे इमारतीचे फर्निचर नूतनीकरणाचे काम केले होते. या कामाचे रुपये 48,60,455/- बिल झाले होते. त्यापैकी तक्रारदार यांना 40 लाख मिळाले असून उर्वरित रु. 8,60,455/-, तसेच त्यांनी केलेल्या इतर किरकोळ कामाचे रुपये 4,98,000/- असे बिल मिळणे बाकी होते. अनिल बनकर हे एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड, मुंबई या सहकारी बँकेचे संचालक आहेत. बनकर यांनी कामाचे रुपये 8,60,455/- रकमेची मंजुरी एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या सहकारी बँकेचे संचालक मंडळाकडून प्राप्त करून त्याची ऑर्डर आणून स्वतः जवळ ठेवली होती, ती ऑर्डर बँकेत देण्याकरिता रुपये 4,00,000/-तसेच उर्वरित रकम रूपये 4,98,000/- मिळवून देण्याकरीता रुपये 1,00,000/- अशी एकूण पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

ACB ला तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिनांक 23/07/2026 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान बनकर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई या सहकारी बँकेचे संचालक मंडळाकडील 8,60,000/- मंजीची ऑर्डर देण्याकरिता रुपये 4,60,000/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रुपये 4,00,000/- लाचेची मागणी केली, तसेच उर्वरित 4,98,000/-मंजूर करण्याकरिता व डिपॉझिट रक्कम 5,00,000/- परत देण्याकरिता 2,00,000/- अशी एकूण रुपये 6,00,000/- लाचेची मागणी करून सुरुवातीस 4,00,000/- स्वीकारण्याचे मान्य केले आणि पुढील बिल मंजूर झाल्यानंतर 2,00,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले असल्याचे निष्पन्न झाले.

लाच मागणीच्या अनुषंगाने दिनांक 23/07/2026 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान अनिल बनकर यांनी तक्रारदाराकडून बारामती एस.टी. स्टैंड समोरील रोडवर आलोसे त्यांच्या चार चाकी वाहन MH42 BE 5787 मध्ये लाचेची रक्कम रुपये 4,00,000/- पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *