थेऊर (हवेलीनामा) मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गाव पातळीवर वार्डनिहाय आरक्षण सोडत घेण्यात आली होती परंतु थेऊर ग्रामपंचायत आरक्षण सोडती संदर्भात आलेल्या हरकतीनंतर पुन्हा फेर वाढ आरक्षण संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थान समोर आरक्षण सोडत घेण्यात आली यावेळी थेऊर गावातील अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

सन 2026 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या वार्ड आरक्षण सोडतीची प्रक्रिया २६ मे २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली यावर ग्रामस्थांकडून आलेल्या हरकतीनुसार उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार थेऊर येथील ग्रामपंचायत फेर वार्ड आरक्षण संदर्भात ग्रामसभा घेऊन पुन्हा आरक्षण सोडत घेण्यात आली यामध्ये एकूण सहा वॉर्ड मध्ये ही सोडत घेण्यात आली. 24 जुलै 2026 रोजी आरक्षण अंतिम अधिसूचना जाहीर करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ही आरक्षण सोडत घेण्यात आली होती.

थेऊर मधील वार्ड निहाय आरक्षण खालील प्रमाणे

 

वार्ड क्र. १ – अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, नागरिकाच्या मागास प्रवर्ग

 

वार्ड क्र. २ – अनुसूचित जाती महिला , सर्वसाधारण महिला , सर्वसाधारण

 

वार्ड क्र. ३ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , सर्वसाधारण महिला , सर्वसाधारण

 

वार्ड क्र. ४ – अनुसूचित जमाती, सर्वसाधारण

 

वार्ड क्र. ५ – सर्वसाधारण महिला , नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण

 

वार्ड क्र. ६ – अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला

 

या आरक्षण सोडतीसाठी लोणी काळभोर चे मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे अध्याशी अधिकारी म्हणून काम पाहीले तर थेऊरच्या ग्राम महसूल अधिकारी सरला पाटील यांनी सहाय्यक म्हणून काम पहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *