लासुर्णे (हवेलीनामा) जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लासुर्णे येथे दाखल झाला आणि नेहमीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी या सोहळ्याचे जल्लोषात स्वागत केले येथील मुस्लिम समाज वर्षानुवर्ष वारकऱ्यांसाठी गरम गरम बेसन आणि भाकरी वाटप करत आहेत अतिशय मनोभावे या वारकऱ्यांची त्यांनी सेवा केली गरम बेसन आणि गरम भाकरीवर वारकऱ्यांनी ताव मारला गेली वीस वर्षापासून हे मुस्लिम बांधव वारकऱ्यांची सेवा करत आहेत जवळपास अडीच ते तीन हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतात या मुस्लिम बांधवांच्या सेवेला वारकरी देखील तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आशीर्वाद देतात खरंतर या वारीमध्ये या मुस्लिम समाजाच्या सेवेमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीकच निर्माण झालेलं आहे.
शहानूर मुलाणी,मुबारक मुलाणी,ईन्नूस तांबोळी,फिरोज सय्यद,ईन्नूस मुलाणी,इरफान मुलाणी,अरबाज मुलाणी,निजाम कुरेशी,सूरज सय्यद दीपक पाटील, हसीम मुलानी,दादा खोमणे,नाना ड्रायव्हर, उत्तम ड्रायव्हर, रेहान सय्यद आणि घरातील सर्व मंडळी गरम भाकरी चुलीवर बनवून वारकऱ्यांची सेवा करतात या निघालेल्या वारीमध्ये आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ही कुटुंब वारकऱ्यांची सेवा सेवेसाठी अहोरात्र झटून करतात. सकाळी सहा वाजताच तयारीला लागतात या कुटुंबाशी हवेलीनामाचे प्रतिनिधी बापूसाहेब धुमाळ यांनी वार्तालाप केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही सकाळी सहा वाजताच तयारीला सुरुवात करतो साधारण आठ वाजेपर्यंत आमचं स्वयंपाक पूर्ण होतो व तिथून पुढे येणाऱ्या वारकऱ्यांना आम्ही बेसन भाकरीचा महाप्रसादाचे वाटप करतो, ही सेवा करताना आम्हाला देखील पंढरीची वारीचा अनुभव येतो आणि या मनोभावी सेवेत आमच्या कुटुंबातील लहान थोरापासून सर्व जण सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करतात खरंच या सेवेमुळे आम्हाला देखील समाधान लागते.
