थेऊर (हवेलीनामा) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या उपबाजार आवारासाठी खरेदी करण्याचा व्यवहार गेली अनेक दिवसांपासून चालू असून आतापर्यंत झालेल्या सर्व व्यवहाराची अहवाल शासन दरबारी सादर केल्यानंतर पुढील व्यवहारासाठी शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराला पुढील आदेशापर्यंत खिळ बसली आहे
हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेली पंधरा वर्षांपासून बंद असून तो पुन्हा पूर्ववत चालू हवा यासाठी अनेक प्रयत्न झाले सध्या कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने महसुली भांडवल उभी करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना उपबाजार विस्तारीकरणासाठी विक्री करण्याचे ठरले त्यानुसार यापैकी निम्मा खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्याची चर्चा परिसरात आहे आज पर्यंत झालेल्या व्यवहाराची सर्व माहितीचा अहवाल दिनांक 26 जून 2026 रोजी शासनाकडे सादर केल्यानंतर शासनाच्या पणन संचालनालयाने या व्यवहाराला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे अशा प्रकारचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
या स्थगिती आदेशानंतर या जमीन विक्री प्रक्रियेला खेळ बसणार का असा प्रश्न उपस्थित होतो नेमकं हा व्यवहार पूर्ण कधी होणार आणि कारखान्याच्या सभासदांचे कामगारांचे देणे कधी मार्गी लागणार हा प्रश्न अधोरेखित होत आहे गेली तीन वर्षापासून कारखान्यावरील संचालक मंडळ कार्यरत असून कारखाना सुरू करण्यासाठी अनेक विविध पर्याय शोधून देखील यातून मार्ग निघालेला नाही त्यामुळे हा कारखाना पुन्हा पूर्वपदावर कधी येणार हा प्रश्न सभासदांपुढे आहे.
