थेऊर (हवेलीनामा) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जून २०२६ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडीच्या थेऊर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा बूथ व एक ट्रांसिट टीम यांच्या माध्यमातून अपेक्षित लाभार्थी संख्यापैकी १०२५ तर प्रत्यक्ष ९३३ लाभार्थ्यांना पोलिओ डोस पाजण्यात आला तर ट्रान्झिट टीम द्वारे चिंतामणी मंदिर येथे १७८ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला तसेच रात्र टीम द्वारे आरोग्य सहायक सुनील आखाडे, आरोग्य सेवक बाळासाहेब चोपडे, योगेश देवकर, सचिन वाघमारे, वाहन चालक सचिन मोटे यांनी थेऊर व नायगाव येथील ऊसतोड व पोल्ट्री फार्म वरील कामगार यांच्या ३७ बालकांना पोलिओ डोस पाजला.उर्वरित लाभार्थी आय पी पी आय अंतर्गत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.काकडे मळा व तारमाळा येथे सभापती युवराज काकडे पंचायत समिती हवेली यांनी पोलिओ बूथ चे उद्घाटन केले. आरोग्य उपकेंद्र थेऊर पोलिओ बूथ चे उद्घाटन उपसरपंच अप्पासाहेब काळे यांच्या हस्ते तर भीम नगर बुथ चे उद्घाटन पंचायत सदस्य राहुल कांबळे यांच्या हस्ते झाले.यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे , डॉ. रूपाली भंगाळे, आरोग्य सहाय्यक सुनील आखाडे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब मारणे,आरोग्य सहायिका वैशाली दुर्गाडे,प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी यांच्या मार्गदर्शनाने समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. शिल्पा दलाल,आरोग्य सेवक योगेश देवकर ,आरोग्य सेविका सुषमा काळभोर, आशा सेविका दिपाली सावंत, रूपाली गाडे ,निर्मला कांबळे, पुष्पलता गायकवाड,ज्योती टोम्पे, अर्धवेळ परिचयसहा बूथ मिळून अनुराधा आखाडे इत्यादींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वी पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *