पुणे (हवेलीनामा) संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात असून याचाच भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन, मांजरी बुद्रुक पुणे झोन, येथे संत निरंकारी मिशन ची अंतर्गत आव्हाळवाडी सेक्टरच्या वतीने आव्हाळवाडी,मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन,केशवनगर, हिंगणगाव,वाडे बोल्हाई.संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा नुकतेच “रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन १६३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.हे सर्व संकलित रक्त ससून रक्तपेढीला देण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन अशोक आहुजा (झोनल प्रमुख, पुणे), सुरेश घुले ( राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , पुणे मध्यवर्ती बँक संचालक), अजित घुले ( नगरसेवक) सौ.सारिका घुले ( नगरसेवक) यांच्या हस्ते झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मिशन द्वारा मांजरी परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी मांजरी परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार दत्तात्रय सातव (आव्हाळवाडी सेक्टर प्रमुख) यांनी मानले. अवनीत तावरे (क्षेत्रीय संचालक, पुणे सीटी) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील आव्हाळवाडी सेक्टर चे संयोजक,मुखी,सेवादल , स्वयंसेवकांनी योगदान दिले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *