पुणे (हवेलीनामा) गुन्हे शाखेच्या युनिट सात मधील पोलीस कर्मचारी यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करत त्यांच्याकडून सहा मोटार सायकल हस्तगत केल्या व या प्रकरणात एकूण तिघांना बेड्या घातल्या.
युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरी. कांबळे व पोलीस अंमलदार असे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना मोटार सायकल चोरी करणारे अभिलेखावरील दोन आरोपी बायफ रोड वाघोली पुणे येथे उभे असल्याचे गोपनीय बातमी प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे १) अरसलान मुस्ताक तांबोळी वय १८ वर्षे रा. कृष्णकुंज फेज २, बकोरी रोड, वाघोली, पुणे २) सिद्धांत दिलीप वाघमारे वय १८ वर्षे हे दोघे मोटरसायकलवर संशयतरित्या उभी असलेली आढळले . त्यांच्याकडे मोटार सायकल बाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागले. युनिट ७ पथकाने कसुन चौकशी केली असता त्यांचे ताब्यातील मोटार सायकल ही चोरीची असल्याचे आणि त्यांनी आणखी ५ मोटार सायकल त्याचे साथीदार १) अरमान रियाज तांबोळी वय १८ वर्षे रा. कृष्णकुंज फेज २, बकोरी रोड, वाघोली, पुणे व एक विधीसंघर्षित बालक यांचे सह चोरी केल्याचे कबुल केले. युनिट ७ पथकाने एकुण ६ मोटार सायकल व ४ मोबाईल असा एकुण ४,९५,०००/-रु.कि चा माल हस्तगत केला आहे. तपासामध्ये १) लोहगाव २) लोणी काळभोर ३) लोणी काळभोर ४) शिक्रापुर ५) विश्रांतवाडी६) भोसरी असे एकुण ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितिन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, नेहा तापकीर, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.
