थेऊर (हवेलीनामा) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथे शिवसेना नेते स्वप्निल कुंजीर तसेच सामाजिक कार्यकर्ते हभप डॉ राजाराम रायकर यांच्या अथक पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी अधिकृत बस थांबा मंजूर करण्यात आला असून या बस थांब्याच्या फलकाचे आज अनावरण करण्यात आले यावेळी कुंजीरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहराचा विस्तार होत असताना राज्याच्या विविध भागातून शहरांमध्ये शिक्षण व व्यवसाय रोजगार या साठी विदर्भ मराठवाडा या राज्याच्या भागातून लाखो नागरिक येत असतात पुणे शहरात जोडणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूर लातूर बीड परभणी यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लहान मोठ्या सर्व शहराला एसटी महामंडळाच्या बसने जोडलेले आहे कुंजीरवाडी हे मध्यवर्ती ठिकाण असून कुंजीरवाडी शेजारील अन्य गावातून आपल्या गावाकडे जाताना या नागरिकांना हडपसर किंवा उरुळी कांचन या ठिकाणी एसटी बस साठी जावे लागत असे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अडचणी येत होत्या या सर्व गोष्टीचा विचार करून कुंजीरवाडी येथील शिवसेना नेते स्वप्निल कुंजीर यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात एसटी महामंडळाच्या स्वारगेट कार्यालयात संपर्क करून त्यांना रीतसर निवेदन दिले आणि कुंजीरवाडी या ठिकाणी एसटीचा अधिकृत बस थांबा द्यावा अशी विनंती मागणी केली यावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या अडचणीचा विचार करत हा अधिकृत बस थांबा मंजूर केला आणि या बस थांब्याचे फलक अनावरण करण्यात आले यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष आभार व्यक्त केले आहे.

एसटी महामंडळाकडून हा थांबा अधिकृत दिला असला तरीही वाहकांच्या मशीनमध्ये हा थांबा येण्यास थोडा कालावधी लागणार असल्याने हळूहळू या मार्गावरील सर्व बसेस या ठिकाणी थांबतील याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे येत्या काही दिवसातच मराठवाडा व सोलापूर हैदराबाद कडे जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी थांबा घेऊन पुढे जातील अशी खात्री परिसरातील नागरिकांना झाली आहे.वाहतूक निरीक्षक सूरज हुंबे, श्री खळदकर व कार्यालयीन कामकाज अधिकारी आयशा शेख हे एस टी महामंडळ अधिकारी उपस्थित होते

पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर याठिकाणी जाणाऱ्या भाविकांनी आनंद व्यक्त केला उद्घाटनवेळी जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष लक्ष्मण कुंजीर, शिवसेना नेते स्वप्नील कुंजीर, सचिव दत्तात्रय कुंजीर, डॉ राजाराम रायकर, रामदास कुंजीर, नंदकुमार कुंजीर, फुलचंद कुंजीर, सागर झेंडे, सुरेश सावंत, योगेश झेंडे, विष्णू नरके, नारायण बंडगर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *