थेऊर (हवेलीनामा) एखादी नामांकित शाळा आपल्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी सुपरिचित असते आणि आपल्या या नावीन्यपूर्ण व वेगळेपणा इतरांनाही सामावून घेत असताना जो आनंद मिळतो तो अगदी वेगळाच, असाच एक उपक्रम दि कल्याणी स्कूल गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथील जिल्हा परिषद तारमाळा शाळेमध्ये अविरत वेगवेगळे उपक्रम छोट्या दोस्तांंबरोबर राबवत असतात शाळा सुरू झाल्यानंतर चा हा पहिला शनिवार आनंदाचा बागडण्याचा मस्ती करण्याचा असाच ठरला. शाळा म्हटलं की फक्त वया पुस्तक वाचन लेखन इतकच डोळ्यासमोर येतं परंतु दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या घटना घडतात ज्यामध्ये आपल्याला सहभागी व्हावे लागते त्या प्रत्येक गोष्टी विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्या यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जातं.

कागदांचा वापर करून विद्यार्थ्यांना वेगवेगळी खेळणी तयार करणे यामध्ये पाण्यावरचे नाव बास्केट बनवणे विमान बनवणे अशा छोट्या-मोठ्या आनंददायी विद्यार्थी प्रिय अशा कल्पना समोर ठेवून विद्यार्थ्यांकडून करून घेऊन जो या विद्यार्थ्यांच्या मनाला आनंद देणारा ठरतो त्याचीच तयारी केली जाते.

मुळातच तारमाळा येथील जिल्हा परिषद शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेमधील विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये रमलेली असतातच त्यात पुण्यातून येऊन कल्याणी स्कूलचे संस्थापिका दिक्षा कल्याणी मुख्याध्यापिका निर्मल मॅडम व शिक्षक यात सहभागी होतात.

विद्यार्थ्यांमध्ये गायनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सर्व साहित्य घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते यात विद्यार्थी अत्यंत आनंदाने सहभागी होत असतात एकंदरीतच शनिवारचा हा आनंदाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *