पुणे (हवेलीनामा) अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांची क्रेज झपाट्याने वाढत असल्याने मराठी शाळेतील विशेषतः जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या खालावत आहे यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाडगे गावच्या सरपंच यांनी एक नामी शक्कल लढवत जे पालक आपल्या पाल्याची प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये करतील त्या पालकांच्या घराची सर्व घरपट्टी सरपंचामार्फत भरली जाईल असे जाहीर केले यामुळे जिल्हा परिषदेतील शाळेत विद्यार्थी संकेत नक्कीच भर पडेल असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे.

घाडगे गावच्या सरपंच चेतली चेतन ढवळ यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी एक शक्कल लढवली असून जिल्हा परिषद शाळेत जेवण पालक आपल्या विध्यार्थ्यांना प्रवेश घेतील त्यांची घरपट्टी सरपंच भरणार आहेत. ही संपूर्ण राज्यातील एक स्तुत्य असा उपक्रम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या उपक्रमाची राज्यात चर्चा होत असून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या अवलंबल्या जाऊ शकतात हे यावरून दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *