थेऊर (हवेलीनामा) पावसाने प्रचंड ओढ दिल्यामुळे पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतींना गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे परिसरातील सर्व जलस्रोत खालावले असून पुढील काही दिवसात तरी पावसाची शक्यता नसल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश सर्वच शहरांमध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे त्याच धर्तीवर पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतींना देखील पाण्याचे नियोजन करावे लागत आहे . थेऊर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागांना सुद्धा ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पुढील काही दिवस एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याचे प्रशासकीय मंडळाने सांगितले.

थेऊर येथील पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे नैसर्गिक जलस्रोतावर अवलंबून आहे त्यामुळे जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून देखील पाऊस झाला नाही त्यामुळे हे जलस्त्रोत खालावले आहेत त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे अवघड जात आहे तरीही पाणीपुरवठा कर्मचारी अत्यंत चोखपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत सर्व जलस्रोतांचे एकत्रीकरण करून जल कुंभ भरण्याचे काम चालू आहे परंतु पाणीपुरवठा कमी होत असल्याने यापुढे काही दिवस नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *