थेऊर (हवेलीनामा) जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील काही नामांकित जिल्हा परिषद शाळा नावा रूपाला आल्या आहेत खानवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या धरतीवर थेऊर मधील सर्व जिल्हा परिषद शाळांचा एक संघ तयार करून त्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण संकुल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असून तो लवकरच साकार करण्याचा प्रयत्न आपण करू असे हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.सध्या येथे सातवीचा वर्ग मान्यतेसाठी प्रस्तावित असून त्यास लवकरच मान्यता मिळेल. सभापती काकडे तारमाळा येथील प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित प्रवेसोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हवेली गट विकास अधिकारी शेखर शेलार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कुंजीर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा विकास कुंजीर,उपाध्यक्ष काजल टेमगिरे,सुखराज कुंजीर, जिजाबा कुंजीर, नवनाथ कुंजीर, ज्येष्ठ नागरिक तुकाराम पायगुडे सामाजिक कार्यकर्ते रूपचंद बोडके व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी सभापती व गटविकास अधिकारी यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवर व पालकांनी शालेय पोषण आहाराचा स्वाद घेतला आणि समाधान व्यक्त केले.

प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध असे आयोजन करण्यात आले होते इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे रथातून मिरवणूक काढत हलकीच्या नादात स्वागत करण्यात आले या सोहळ्यामध्ये सभापती व गटविकास अधिकारी तसेच माता पालक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवोदित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी सांगितले की तारमाळा येथील ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अतिशय शिस्तबद्ध व उपकरणाशील असल्याने या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच आपणास आनंद झाला येतील विद्यार्थ्यांचे पालक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने व प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असल्याने शाळेतील विविध उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत भविष्यात या शाळेच्या विकासासाठी शासकीय योजनांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले.यावर्षी तारमाळा शाळेची निवड मॉडेल स्कुल म्हणून सन २०२६ – २७ साठी प्रस्तावित आहे त्यामुळे या शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे भविष्यात आवश्यक असणाऱ्या शालेय खोल्या संगणक व प्रयोगशाळा याची उपलब्धता होणार आहे.

थेऊर मधील सर्वच प्राथमिक शाळा व अंगणवाडी यामध्ये प्रवेश उत्सवाचे भव्य दिव्य अशी कार्यक्रम आयोजन केले होते अंगणवाड्या रंगीबिरंगी फुग्याने सजवल्या होत्या, आलेल्या लहानग्याना हा आगलावेगळा आनंद झाला गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सभापती यांनी या अंगणवाड्याना देखील भेटी दिल्या त्यांच्यासोबत गट विकास अधिकारी देखील उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *