थेऊर (हवेलीनामा) बालपण आणि शाळा हे एक अतूट नातं असून बालपणातील शाळेचा पहिला दिवस हा एक जीवनातील अमूल्य असा ठेवा या दिवसाचे अवचित्य साधून बालकांना शालेय शिक्षणाबरोबर सांस्कृतिक व संस्कारीत शिक्षण देण्यासाठी भारतीय संस्कृती अनन्य साधारण महत्त्व आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये हा दिवस सरस्वती पूजनाने साजरा केला जातो त्याच धर्तीवर आधुनिक काळातील विशेषतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळेचा पहिला दिवस हा अतिशय आगळ्यावेगळ्या व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला जातो थेऊर येथील प्राथमिक शाळा तारमाळा येथे गेली अनेक वर्षांपासून हा शाळेचा पहिला दिवस अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो आलेले नव प्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शालेय शिक्षण समिती तसेच माता पालक समिती यांच्या वतीने स्वागत केले जाते आणि आलेल्या बालकांना खाऊचे वाटप केले जाते.

यावर्षी शाळेचा पहिला दिवस अर्थात १५ जून सोमवारी असून या दिवशी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे असेच पंचायत समिती हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार तसेच तालुका शिक्षणाधिकारी हेमंत कुमार खाडे उपस्थित राहणार आहे. यासाठी या शाळेने शाळेमध्ये सर्व तयारी केली असून शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे आलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांना येथील शाळेच्या भिंती शिक्षणाचे महत्त्व विशद करणार असून या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना बरेच काही शिकवणार आहे त्यामुळे आलेल्या बालकांसह येणाऱ्या पालकांना देखील शाळेचे पालटलेले स्वरूप पाहता येणार आहे.
