पुणे (हवेलीनामा) अन्न व औषध विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी सूत्र स्विकारल्यानंतर संपूर्ण राज्यातील सुस्तावलेले FDA चे अधिकारी खडबडून जागे झाले असून राज्यात धाडसत्र चालू झाले. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कसलीच तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका मुंडे यांनी घेतल्याने संपूर्ण राज्यातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांनी नुकताच एक आदेश जरी केला असून गुटखा व तत्सम पदार्थांची विक्री साठवणूक वाहतूक करणारे तसेच होलसेल व किरकोळ व्यापारी यांच्यावर या विभागाच्या वतीने मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे गेली अनेक वर्ष मोकाट सुटलेले हे गुटखा व्यावसायिक आता मात्र पूर्णपणे घाबरलेले दिसत आहेत त्यामुळे एकेकाळी सरास विक्रीला जाणारा गुटखा बाजारपेठेतून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे तरीही काही यातील गब्बर मात्र चोरून लपून काळ्याबाजाराने हा गुटखा विकताना दिसत आहे.
एकेकाळी पान टपऱ्यावर तसेच काही किराणा मालाच्या दुकानामधून सर्रासपणे विकला जाणारा गुटखा मात्र अलीकडच्या काळात गायब झाल्याचे दिसते आहे हा एक सकारात्मक परिणाम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेल्या चांगल्या निर्णयाचा परिणाम जाणवत आहे समाजाच्या आरोग्याची कसलीच तडजोड केली जाणार नाही मग त्यात हॉटेल तसेच रस्त्यावर उभे असलेल्या फूड स्टॉल मधून विकले जाणारे खाद्यपदार्थ असो या सर्व गोष्टींवर अन्न व औषध प्रशासनाचे करडी नजर असणार आहे.

सर्वात समाजासाठी सुखकर अशी गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्ष गुटखा व्यवसायिकांवर कारवाईचे धाडस व हा गुटखा विक्री व्यवसाय नियंत्रणात आणून तो पूर्णपणे बंद करण्यात कोणालाही यश आलेले नव्हते परंतु तुकाराम मुंढे सारख्या अत्यंत प्रामाणिक व समाजासाठी दडनिशय असणाऱ्या अधिकाऱ्यामुळे हे शक्य झाल्याचे समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
