थेऊर (हवेलीलामा) अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यात धाडसत्र सुरू झाले विशेष करून तयार अन्न आणि दुग्धजन्य पदार्थासह सुगंधी पान मसाला व गुटख्यावर धाडी घालून लाखो रुपयाचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने हस्तगत केला. आज पर्यंत सुप्तावस्थेत असलेले अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले कारण तुकाराम मुंढे यांच्यासारखा आयुक्त या कार्यालयास लाभल्याने सर्व स्तरातून या कृतीची वाहवा होताना दिसत आहे. एवढे असले तरीही पुणे शहरा नजीक असलेल्या पूर्व हवेलीत मात्र आजही गुटख्याची विनाधिक्कतपणे आणि मोठ्या प्रमाणात विक्री होत असून याकडे या अन्न व औषध प्रशासनाचे कधी लक्ष जाणार असा सवाल या परिसरातील नागरिकांनी विचारला आहे.

तरुण पिढी सुगंधी पान मसाल्यासह गुटखा आणि गुंगीचे पान या चारही गेली असेल व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा पान टपऱ्यांवर अचानक धाडी टाकून याला प्रतिबंध केला तर तरुण पिढी अशा व्यसनाधीनते पासून दूर राहू शकेल सध्या पूर्वी मध्ये अशा प्रतिबंधित पानांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. गुटख्यामुळे असाद्य रोगाला आमंत्रण दिले जाते यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले असते तरीही तरुण पिढीला या गुटखा व पान मसाल्याचे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे राज्यात याला प्रतिबंध असता तरीही समांतर बाजारपेठ उभी करून मोठ्या प्रमाणात याची विक्री करून आपला आर्थिक विकास करण्याचा अनेकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे.

त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाबरोबरच उत्पादन शुल्क विभागांची सुद्धा या भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते कारण हडपसर व फुगेवाडी परिसरामध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणानंतर पूर्व हवेली मधील अशा प्रकारची व्यवसाय बंद होणे अपेक्षित होते परंतु आजही अनेक जण रस्त्याने झिंगताना दिसत आहेत यावरून या परिसरामध्ये आजही हातभट्टी दारू विक्री चालूच असल्याचे जाणवते तसेच अशा प्रकारच्या हातभट्ट्या परिसरात कोणकोणत्या भागात आहेत हे शोधून काढणे उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलीस प्रशासनाचे देखील आहे त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण विभाग पुणे शाखा विभाग नार्कोटिक विभाग सक्रिय होण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

अशा प्रकारच्या अवैध दारू उत्पादन यावरील कार्यवाही केवळ घटना घडल्यानंतर न होता यामध्ये सातत्यता राहणे आवश्यक आहे तरच समाज निरोगी राहू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *