पुणे (हवेलीनामा) महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यावर नविन मीटर जोडणी करिता १२ हजाराची लाच स्विकारताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना रंगीहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकारानुसार,लोकसेवक रामचंद्र नारायण लोंढे, वय 42 वर्ष, पद अतिरिक्त कार्यकारी अभियंता, (वर्ग-1), महावितरण नेमणुकीचे ठिकाण हडपसर यांच्यावर ही सापळा कारवाई करण्यात आली.

यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणाची कामे करतात. महावितरणचे उप विभाग-2, हडपसरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे हे तक्रारदार यांनी केलेल्या नवीन 12 वीजमीटर जोडणीच्या कामाचे एक हजार रुपये प्रतिमीटर प्रमाणे तक्रारदाराकडे बारा मीटरचे 12,000/- रुपयांची मागणी करत आहेत तसेच तक्रारदार यांना मिळालेल्या अन्य एका नवीन इमारतीच्या वीज कनेक्शनच्या कामाकरिता 50,000/- हजार रुपये ची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.2/6/2026 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान लोकसेवक अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे यांनी तक्रारदाराकडून बसविण्यात आलेल्या नवीन 12 वीजमीटर जोडणीसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाच मागणीच्या अनुषंगाने दिनांक 4/6/2026 सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक रामचंद्र नारायण लोंढे यांनी तक्रारदाराकडून त्याच्या केलेल्या कामाच्या बदल्यात मोबदला म्हणून 7,500 रुपयाची लाच स्वीकारली असता कार्यालयातून रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
