पुरंदर (हवेलीनामा) “बेलसर गावची गायरानाची इंचभर जमीन देखील महावितरणला देणार नाही आणि गावावर जबरदस्ती केली तर तीव्र आंदोलन आणि उपोषण करू असा इशारा देत ”; बेलसर ग्रामस्थांनी महावितरणच्या प्रकल्पास कडाडून विरोध दर्शवला आहे.

पुरंदर तालुक्यातील बेलसर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरान जमिनीवरून महावितरण आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र विरोध निर्माण झाला असून बेलसर ग्रामस्थ ही जमीन कुठल्याही परिस्थितीत देण्यास तयार नाहीत.ग्रामस्थांनी आरोप केले आहेत की, ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवून, कुठलाही पत्रव्यवहार न करता महावितरणने थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून ४० एकर गायरान जमिनीची मागणी केल्याने गावात संतापाची लाट उसळली. या विरोधात स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेली ही जागा, येथेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील पहिली लढाई झाली होती, त्यामुळे या ऐतिहासिक स्मृती जपाव्यात म्हणून येथे भव्य ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावे तसेच लवकरच पुरंदर विमानतळ साकारणार असल्याने ससून रुग्णालयाच्या धर्तीवर जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे या जमिनीचा ताबा कुठल्याही परिस्थितीत महावितरणला दिला जाणार नाही.

पुणे शहराच्या चोहोबाजूने नागरिकरणाचे पेव फुटले असून जमिनींना सोन्याचे दिवस आले आहेत त्यामुळे सरकारी जमिनी धोक्यात आल्याचे दिसून येते निसर्गाचा चक्र धोक्यात आल्याचे दिसून येत असून वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे बेलसर येथील या गायरान जमिनीवर ग्रामस्थांनी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून हजारो वृक्ष लावले आहेत यावर महावितरणच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून कुऱ्हाड चालवली जात आहे कुठलाही प्रकल्प हा मानवाच्या कल्याणासाठी राबवला जाऊ शकतो परंतु मानवी अस्तित्वास धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प हा धोकादायकच ठरू शकतो महावितरण अशा प्रकारचे प्रकल्प उजाड मरणावर विशेषतः वनविभागाच्या जमिनी ताब्यात घेऊन उभारल्यास त्या जमिनीची उपयुक्तता ही वाढेल आणि वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होईल परंतु दुष्काळग्रस्त असलेले या पुरंदर तालुक्यातील गायरान जमिनी जेथे दहा ते पंधरा वर्षे जुने असलेली झाडे तोडून असा प्रकल्प उभारणे हे कितपत फायद्याचे ठरेल हा शासकीय अधिकाऱ्यांनी देखील विचार करण्यासारखा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *