छत्रपती संभाजीनगर (हवेलीनामा) थेट पोलीस आयुक्तालयात जाऊन सीआयडी/सीआयडीबी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या तीघाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या . इशरत खान, लक्ष्मण गवळी आणि तहर शेख अशी या तोतयांची अधिकाऱ्यांची नावे असून, त्यांच्या गळ्यातील संशयास्पद आयकार्ड पाहून पोलीस आयुक्तांनी स्वतः त्यांची उलटतपासणी केली आणि त्यांना गजाआड केले.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढून गैरमार्गाने लोकांवर दबाव टाकण्यासाठी वापरणार होते असे तपासात निष्पन्न झाले.

गळ्यात ‘क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह (बी)’ (C I D B) नावाचे बनावट ओळखपत्र आणि भारत सरकार मान्यताप्राप्त असल्याचे खोटे लेटरहेड बाळगले होते.आयुक्तालयात नागरिकांशी संवाद साधताना पोलीस आयुक्तांचे लक्ष या तोतयांच्या गळ्यातील ओळखपत्रावर गेले.त्यावरील ‘सीआयडीबी’ (CIDB) हे नाव पाहून संशय आल्याने आयुक्तांनी त्यांची कसून चौकशी केली.सर्व ओळखपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांनाही तत्काळ पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.तसेच या तिघांना बनावट ओळखपत्रे पुरवणाऱ्या हरिद्वार (उत्तराखंड) आणि नवी दिल्ली येथील मुख्य सूत्रधाराचाही पोलीस शोध घेत आहेत.

बनावट आधारकार्ड मतदानकार्ड हे सर्रास एकीवात असणारे शब्द परंतु गृह खात्याशी संबंधीत अधिकाऱ्यांच्या ओळखपत्राची हुबेहूब कॉपी तयार करून पोलीस अधिकाऱ्यांच आपले लक्ष करणारी समाज विघातक समोर आल्याने आपल्या यंत्रनेच्या मर्यादा समोर येताना दिसत आहेत. अशा प्रवृत्ती वेळीच ठोकून काढल्या नाहीत तर समाज व्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल. अशी बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे आणि असे धाडस करण्याचे कोणास सुचणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *