किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर एसटी बसस्थानकावर एसटी महामंडळाच्या लालपरीचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी गाडीला व बसस्थानकाला आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच बसस्थानकावर आकर्षक रांगोळी रेखाटली होती. एसटीचे कर्मचारी बसस्थानकावर प्रवाशांचे स्वागत करताना दिसत होते. वर्धापनदिनानिमित्त गाडीची पूजा झाल्यानंतर प्रवाशी बांधवांच्या हस्ते केल कापण्यात आला. प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढे वाटण्यात आले. याप्रसंगी वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम, कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, वाहतूक निरीक्षक प्रविण तुपसांगवे, सहायक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, स्थानक प्रमुख उत्तम लांडे उपस्थित होते.
याप्रसंगी भाषणात बोलताना वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम यांनी एसटीचे महत्व व कर्मचाऱ्यांची जबाबदारी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर आगारव्यवस्थापक उज्वला कुटे यांनी प्रवासी व कर्मचारी यांना लालपरीच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वरिष्ठ लिपिक स्नेहा कातोरे, कामगार संघटना सचिव दत्तात्रय गभाले, आगार लेखाकार नेहा टाक, पुष्पा चासकर, रोहीणी साबळे, रंजना बिराजदार, स्वाती बिराजदार, मनिषा सुतार, विजया बगाटे, पंढरीनाथ शिवले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लोखंडे, सोमनाथ आढळ, पी. ए. किर्दक, मोहन गोपनारायण, प्रशांत दौंडकर, शशिकांत शिंदे, मंगेश वाळूंज, राहुल पाटोळे, राजेश दौंडकर, अविनाश वाडेकर, वैभव सावंत, अंकुश पाटील, हनुमंत घाडगे आदी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गभाले यांनी केले.
