पुणे (हवेलीनामा) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमामधील एक अशी ओळख असलेल्या लाडकी बहीण योजनेतील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. महायुतीने निवडणूक पूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना घोषित करून 18 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले या योजनेचा परिणाम इतका झाला की निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून मते मिळाली हा सर्व लाडक्या बहिणींचाच आशीर्वाद असल्याचे त्यावेळी महायुतीतील नेते मोठ्या अभिमानाने सांगत होते.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जसा जसा कालावधी पुढे जात राहिला तसतसा राज्याच्या तिजोरीवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा वाढत राहिला त्यामुळे राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांची छाननी करण्यासाठी इ केवायसी अनिवार्य केली परंतु राज्यातील अनेक महिला या अशिक्षित व ग्रामीण भागात राहणारे असल्याने त्यांना ही ही केवायसी करणे अवघड जात राहिले त्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू लागल्या शासनाकडून वारंवार ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली परंतु अनेक महिला या योजनेपासून दूर राहून त्यांना मिळणारा आर्थिक लाभ मिळालाच नाही नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल 80 लाख महिला या योजनेपासून वंचित झाल्याचे जाहीर झाले.
राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की या 80 लाख अपात्र महिला या केवळ ई केवायसी मुळे नाही तर यातील काही महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अधिक असल्याने त्या या योजनेपासून अपात्र ठरल्या तसेच काही महिलांचे वयोमान 65 वर्ष पेक्षा अधिक असल्याने त्याही यापासून वंचित राहिल्या त्यामुळे हा आकडा मोठा दिसून येत आहे तरीही अनेक महिलांची ई केवायसी झालेली नसल्याने त्या या योजनेपासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षाने मात्र या संधीचा फायदा घेऊन राज्य शासनावर चौफेर हल्ला चढवला शासनाच्या तिजोरीत पैसा नसल्याने अन्य खात्याचा पैसा या योजनेसाठी वापरल्याने अनेक समाज उपयोगी कामाला खेळ बसल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना फसवी असून ही फार काळ टिकणार नाही लवकरच ही योजना बंद करावी लागणार असेही विरोधक सांगताना दिसत आहेत.
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चालू केलेली ही योजना कोणीही बंद करू शकत नाही त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.
