थेऊर (हवेलीनामा) हवेलीतील कोलवडीत पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले असून शितोळेवस्ती वरील आनंदा तुकाराम गायकवाड यांच्या बंगल्या शेजारी विशाल मारुती गायकवाड यांच्या घराशेजारी बांधलेल्या दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला यात दोन्ही शेळ्या मृत झाल्या.
शितोळेवस्ती येथे राहणारे शेतकरी आनंदा तुकाराम गायकवाड यांनी सांगितले पहाटे व्यायामासाठी घराबाहेर जाऊन फिरून येत असताना त्यांच्या नातवांच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या वर बिबट्याने हल्ला चढवल्याचे त्यांनी पाहिले यात एका शेळीचे पोट फाडले होते तर दुसऱ्या शेळीची मान जबड्यात पकडली होती हे पाहून आनंदा गायकवाड यांनी जोरात आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे नातू व इतर त्या ठिकाणी गोळा झाले तेव्हा या गोंधळाने बिबट्याने पकडलेली शेळी सोडून उसात धूम ठोकली.
शितोळे वस्ती शेजारी जवळपास दीडशे ते दोनशे एकराचे सैन्य दलाची जमीन असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपे आहेत या झोपा मध्ये बिबट्या लपून राहतो आणि अधून मधून येथे राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुत्र्यांवर तसेच शेळ्यांवर हल्ला चढवला जातो वनविभागाकडून यावर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु केवळ तुटपुंजी कारवाई करून हा प्रश्न पुढे ढकलला जातो. वारंवार शेतकऱ्यांच्या पशुधनावर होणाऱ्या हल्ल्या संदर्भात वनविभागाने गांभीर्याने विचार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे राखडली जात आहेत.
या प्रश्नाकडे स्थानिक आमदार लक्ष घालणार का असेही येथील स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कारण अनेक वेळेला असे हल्ले होऊन देखील माननीय आमदार या भागाकडे फिरकलेच नाहीत. वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणेदेखील अवघड झाले आहे त्यामुळे शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. या विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा तीन दिवस तो रात्री तीन दिवस असा वीज पुरवठा असल्याने दिवसा व रात्री शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते बिबट्याच्या वावरामुळे या भागात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोक्याचे वाटते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यावर लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी एकमुखी मागणी होत आहे.
