अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) भारतीय जनतापार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत यादी आज (३१ मे) नवी दिल्ली येथून जाहीर केली. या यादीमध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून शेखर गोरे, धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्यासह सांगलीतूनही काही नावांची चर्चा होती. मात्र, पक्षाने संघटनात्मक ताकद आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन धैर्यशील कदम यांना विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडे या मतदारसंघात तब्बल ६३० मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने भाजपच्या या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *