पुणे (हवेलीनामा) संपूर्ण राज्याचे लक्ष अचानक विषारी दारू पिल्याने 22 लोकांचा बळी गेल्या नंतर अमली पदार्थ विरोधी विभागाकडे लागले कारण हा विभाग नक्की कार्यरत आहे की नाही हाच प्रश्न अलीकडे उपस्थित होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अर्थ विभागाकडे अर्थात पोलीस प्रशासनाकडे आहे परंतु समाजामध्ये कुठल्याही घटना घडल्या तर यासाठी केवळ पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य सूर पुढे येतात परंतु राज्यामध्ये आम्ल पदार्थविरोधी पथक व उत्पादन शुल्क विभाग यांच्या कार्यकुशालतेवर प्रश्न विचारणार आहेत की नाही.

गृह विभागाने पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली असली तरी केवळ पोलीस प्रशासनच यासाठी जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही जो विभाग दारूबंदी साठी जबाबदार आहे त्या विभागातील अधिकाऱ्यांना मोकळे सोडून केवळ पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे हा प्रश्न पोलीस विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून उचलला जात आहे.

कोणत्याही प्रश्नावर केवळ वेळ काढूपणाच्या कारवाई होत असतात, सध्या बनावट दारू उत्पादन तसेच हातभट्टीवर धाड सत्र होत असल्याचे दिसून येत आहे या कारवायाचे सातत्यता भविष्यात चालू राहून हातभट्टी पूर्णपणे नामशेष करण्यात शासनाला यश मिळणार का आणि सर्वसामान्य गरीब नागरिकांचे प्राण वाचणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विषारी दारू मुळे पुण्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत फुगेवाडी परिसरात 14 तर हडपसर येथे सात आणि पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन मध्ये एक व्यक्ती विषारी दारूमुळे मरण पावल्याची माहिती पुढे आली आहे विषारी दारू प्रकरण सध्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आल्यानंतर यावर कठोर कारवाई करण्यात शासन सरसावले आहे. सर्व बाजूंनी होणाऱ्या टीकेनंतर अर्थ खाते खडबडून जागे झाले आहे वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर धाडी पडताना दिसत असून भविष्यात हातभट्टीची दारू विक्री होणार नाही याकडे शासनाने काटेकोरपणे लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्य व्यक्त केले आहे.

अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई राज्य शासनाने केली असून राज्य उत्पादन शुल्क आता खडबडून जागे झाले असून त्यांनी या विषारी दारू प्रकरणात हातभट्टीवर मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *