थेऊर (हवेलीनामा) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून थेऊर येथील श्री चिंतामणी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा झगमगता व युवकांना मार्गदर्शक ठरणारा असा महानाट्य प्रयोग राजा शिवछत्रपती आयोजित केला आहे श्री चिंतामणी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून मागील वर्षांपासून एक सामाजिक उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील तरुण तसेच शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास महानाट्य प्रयोगाच्या माध्यमातून पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येते यावर्षी हे दुसरे वर्ष असून या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील होतकरू तरुण एकत्र येत हा महानाट्य प्रयोग आयोजित करत आहेत.

या उपक्रमासाठी सिने अभिनेत्री, बिग बॉस विजेता उपस्थित राहणार आहे तरुणांमध्ये रिलच्या माध्यमातून प्रसिद्ध असणाऱ्या या तारकांना पाहण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे तसेच राज्याचा सुवर्णमयी इतिहास डोळ्यासमोर साकारताना पाहण्याची संधी मिळत आहे या कार्यक्रमासाठी तरुणांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण अनुभवास येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *