थेऊर (हवेलीनामा) फेब्रुवारी महिन्यात थेऊर येथील पुनावाला स्टड फार्ममधील सुरक्षारक्षकांना ठार मारण्याची धमकी देऊन अनोळखी ७ चोरट्यांनी ८०,०००/- रुपये किंमतीची ०४ चंदनाची झाडे तोडुन त्यांचे ओंडके जबरदस्तीने चोरून नेले. याविषयी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता या तपासादरम्यान ही चंदनाची लाकडे तोडणारी टोळी ही हवेली तालुका शेजारी दौंड तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये एकूण सात जणांचा समावेश असून यापैकी सहा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी गजाआड केले आहे तर एक जण अद्याप फरार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.या चंदन चोर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
यामध्ये रमेश बाबु करडे, वय ५२ वर्षे, केडगांव, ता. दौंड, जि. पुणे, शाम तानाजी साळुंके, वय २९ वर्षे, रा. केडगांव बारी पारधी, ता. दौंड, जि. पुणे, संतोष आण्णा शिवरकर, वय ३० वर्षे, रा. केडगांव बारी पारधी, ता. दौंड, जि. पुणे, विशाल अनिल दामोदरे, वय २६ वर्षे, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे, फिरोज कचरु सय्यद, वय २९ वर्षे, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे. व पिंन्टु ऊर्फ लक्ष्मण भिमा गायकवाड, वय ३० वर्षे, रा. निमोना, ता. शिरुर, जि. पुणे यांना अटक करण्यात आली असुन आरोपी नामे अमोल जाधव रा. वाळवणे, ता. पारनेर, जि. पुणे हा अद्याप फरार आहे.
गुन्ह्याच्या तपासात मुख्य टोळी प्रमुख रमेश करडे याने गुन्हेगारी टोळी करुन वारंवार गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) १९९९ चे कलम ३ (१) (11), ३(२), ३ (४) अन्वये कलमांचा अंतर्भाव करण्या बाबत अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केला होता.त्यावर दिनांक २१/०५/२०२६ रोजी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) कलमांचा अतर्भाव करण्यास मान्यता दिल्याने त्यानुसार मोका कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग, पुणे शहर यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, तत्कालीन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६ सागर कवडे, पोलीस उप-आयुक्त परि-०३ (अतिरीक्त कार्यभार परिमंडळ-०६), श्रीमती अनुराधा उदमले सहा. पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पन्हाळे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक दिगंबर सोनटक्के, तपास पथकातील पोलीस हवालदार आण्णा माने,सागर जगदाळे,निलेश कोल्हे,वैजिनाथ शेलार,विलास शिंदे,सुरज कुंभार पोलीस अंमलदार-सचिन सोनवणे, प्रविण दडस, अशोक गिरी, नितेश पुंडे, गणेश खरात, प्रशांत नरसाळे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *