पुणे (हवेलीनामा) पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोहगाव पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयाची मागणी करत ती लाचेची रक्कम स्वीकारताना लांचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत रंगेहात पकडल्या गेला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, लोहगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले मनोज मधुकर बरुटे यांचेवर लाच स्वीकारले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
थोडक्यात माहिती अशी की,यातील तक्रारदार यांचा जमिनीचा व्यवसाय असून त्यांच्या विरुद्ध लोहगाव पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा (N.C.) दाखल करण्यात आला होता, त्या गुन्हयात मदत केली म्हणून व पढे भविष्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी त्यांच्याकडे 70,000/- रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 30/04/26 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता लोकसेवक पोलीस उप निरीक्षक बरुटे यांनी त्यांच्या स्वतः साठी तक्रारदार यांच्याकडे अदखलपात्र गुन्ह्यात मदत केली म्हणून व पुढे भविष्यात मदत करण्यासाठी पंचा समक्ष 80,000/ रुपये मागणी केली असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे. दिनांक 01/05/2026 रोजी सापळा कारवाई केली असता लोकसेवक पोलीस उप निरीक्षक बरुटे यांनी तक्रारदार यांच्याकडून लोहगाव पोलिस ठाण्यात पंचासमक्ष 80,000/- रुपये स्वीकारले असता रंगेहात पकडण्यात आले आहे.
