थेऊर (हवेलीनामा ) पुणे शहराच्या दोन्ही महानगर पालिका क्षेत्रातून मुळा मुठा नदीचे होत असलेल्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नदीकाठच्या गावावर होत असून या परिसरात प्रदूषणामुळे मोठया प्रमाणावर उत्पन्न होत असलेल्या डासामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर हवेली तालुक्यातील काही सुज्ञ नागरिकांनी दोन्ही महानगर पालिकेसह जिल्हाधिकारी यांना या बाबत निवेदन देऊन तीव्र विरोध दर्शवला आणि यावर त्वरित उपाययोजना कराव्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर उपाययोजना केली नाही तर आम्ही नदीपत्रात बसून अमरण उपोषण करु असा इशारा दिल्यानंतर देखील सुस्त व सर्वसाधारण नागरिकांच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हवेलीतील नागरिकांनी हिंगणगाव येथे महाराष्ट्र दिनी आपले उपोषण सुरु केले आहे.

हिंगणगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे मुळा मुठा नदी पात्रात सर्रासपणे सोडण्यात येणाऱ्या महिला मिश्रीत पाणी तसेच रसायन युक्त पाण्यामुळे माझी पात्रातील जल जीवन पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच या प्रदूषित पाण्यामुळे हवेली तालुका सह दौंड तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे केवळ नागरिकांचेच नाही तर शेत जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पशुधनाचेही नुकसान होत असल्याचे आपल्या निवेदनामध्ये त्यांनी टाकले आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी मागणी केली होती आरोग्य खात्याकडून केवळ किरकोळ पाहणी करून यावर कसले प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही सध्या नदीपात्रामध्ये जलपर्णीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका उत्पन्न होत असून पशुधनास सुद्धा मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी आपले निवेदनात सांगितले यावर त्यांनी दिनांक एक मे पर्यंत यावर उपाययोजना करावी अन्यथा तालुक्यातील नागरिक या जलपर्णीवर बसून अमरून उपोषण करतील असा इशारा हे गीत देण्यात आला होता परंतु शासनाकडून कसलीही उपायोजनाने झाल्याने शेवटी माजी सरपंच अंकुश कोतवाल यांनी आपल्या सहकार्यासह मरण उपोषणास सुरुवात केली आहे.

शासनाकडून होत असलेल्या ह्या असंवेदनशील पणामुळे परिसरामध्ये नागरिकांत मोठी नाराजी दिसून येत आहे यावर त्वरित उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याविषयी लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य पर प्रदूषण नियंत्रण मंत्रालय व राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरातून होत आहे.
