पुणे (हवेलीनामा) पुणे शहरात पुणे पोलिसांकडून विविध भागां मधून नशील्या पदार्थासह प्रतिबंधित गुटखा जप्त केला यामध्ये लाखो रुपयाचा माल पुणे पोलिसांच्या हाती लागला असून काही जणांना पुणे पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

पुणे शहरात पोलीस आयुक्तांकडून ड्रग मुक्त पुणे शहर अभियानांतर्गत ड्रगमुक्त प्रभाग या अभियानाची सुरुवात काल करण्यात आली त्याचवेळी शहराच्या विविध भागात अशा नसलेल्या व समाजविघातक व्यसनी वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपासून फुलचंद पानांमधून नसलेल्या पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून यावर प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या कार्यवाहीची अपेक्षा सामान्य नागरिकांकडून होत आहे या बहुतांशी तरुण मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत असून याचे दुष्परिणाम भविष्यात होण्याचा धोका आहे याकरिता प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपऱ्यांची वारंवार तपासणी होणे अपेक्षित आहे.

यामध्ये फुलचंद पानातुन नशेकरीता वापरत असलेला मादक पदार्थ विक्री करीता आणलेल्या व्यक्तीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले.शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, व सहकारी पोलीस ठाणे हददीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, दिनदयाळ हॉस्पीटल जवळील निर्जन रस्त्यावर, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी ब-याच वेळापासुन एक मोटार टेम्पो बेवारस व संशयास्पद स्थितीत उभा आहे. त्या ठिकाणी एक मोटार टेम्पो बेवारस स्थितीत उभा असल्याचे पोलीस पथकाला दिसले त्यावरुन टेम्पोच्याजवळ जावुन त्याची संशयास्पदरित्या पाठीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडुन आतमध्ये पाहिले असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर असलेली मादक अशा बंटयांच्या गोळ्या असलेली पाकिटे असलेली गोण्या मिळुन आल्या, मिळालेला मुददेमाल एकुण ३.३८,८८०/-रुपयांचा जप्त करण्यात आहे तरी त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तात्काळ गुन्हा दाखल करून गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीसांनी नमुद प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता, वय ३० वर्षे रा. पिंपरी चिंचवड, पुणे यास तात्काळ अटक केलेली आहे.

अशा गुन्हयात आणखी सहभाग आहे का अगर कसे? याबाबत तपास चालु असुन पोलीसांनी केलेल्या तपासात सदर गुन्हयातील जप्त करण्यात आलेल्या बंटयांच्या गोळ्या या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देखील वापरत असल्याबाबत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्याबाबत देखील पोलीसांचा अधिक तपास चालु आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने गुटखा विक्रीसाठी वाहतुक करणा-या व्यक्तीसह वाहन आंबेगाव परिसरात जप्त केले.

अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे आंबेगाव परिसरात गस्त करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांचे बातमी मिळाली की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत आरोपीचा मोठ्या प्रमाणात भरलेला प्रतिबंधीत गुटख्याचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७ कात्रज घाटमार्गे पुणे येथे येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनुषंगाने वरिष्ठांचे परवानगीने कात्रज घाट येथे सापळा रचला परंतु बराच वेळ होवून गेला तरी ट्रक कात्रज घाटातून न आल्याने त्याबाबत अधिक माहीती घेतली असता तो गुटख्याने भरलेला ट्रक हा खेड शिवापुर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली. वरिष्ठांना माहीती देवून त्यांच्या परवागीने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील पोलीस मदत घेवून खेड शिवापुर टोल नाका येथे उभा असलेल्या ट्रक क्र. एम.एच.११ डी.डी.-६५२७ वरील चालक श्रीशैल तम्माराय हाळके, वय ३२ वर्ष रा. मु.पो उमदी, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेतले. ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल गुटखा मिळून आला असून सदरचा गुटखा हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील दोन आरोपीतांनी पुणे शहरात विक्रीसाठी मागवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

यात

१) ६०,२२,८००/- रू. किं. चा प्रतिबंधित विमल गुटखा.

२) २०,००,०००/- रू.किं.चा टाटा कंपनीचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७

३) १०,०००/- रू.कि.चा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट,

एकुण ८०,३२,८००/- रू.

राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच गुटखा व प्रतिबंधित विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या व्यक्तींना बेडया घालून गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने एकुण ४,३२,४५०/-रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

गुन्हे युनिट ७ च्या पोलीस अधिकारी व अंमलदार वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गायत्री पार्क, लेननंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. येथील बिल्डींगचे पार्कंगमधील खोलीमध्ये १) जहीर नुरमोहम्मद शेख, वय ४० वर्षे, पत्ता गायत्री पार्क, लेन नंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. २) अकील नुरमोहम्मद शेख, वय ३८ वर्षे, पत्ता गायत्री पार्क, लेन नंबर १, उंद्रे हॉस्पीटलचे मागे, वाघोली केसनंद रोड, वाघोली ता. हवेली जि. पुणे. यांनी प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याचा मुद्देमाल दिनेश (पुर्णनाव व पत्ता माहीत नाही) व सलमान (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांचेकडुन खरेदी करुन त्यांचे बिल्डींगचे पार्कीगमधील खोलीमध्ये त्यांचे ताब्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व वैधानिक इशारा नसलेले प्रतिबंधीत विदेशी सिगारेट विक्रीकरीता त्यांचे स्वतःचे बिल्डींगचे पार्कीगमधील बंद खोलीत साठा करुन ठेवला असताना मिळुन आल्याने कारवाई करून एकुण ४,३२,४५०/-रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *