पुणे (हवेलीनामा) पुणे महापौर बॉक्सिंग चषक स्पर्धेत शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे निर्विवाद वर्चस्व मिळवत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि २६ कास्य पदकांची कमाई केली यात एकूण ३,५०,००० रुपयांची बक्षीसे मिळविली.

महापौर बोक्सिंग स्पर्धेवर या अकॅडमीने अक्षरशः वर्चस्व मिळविले.आपल्या विद्यार्थ्यांनी केवळ सहभाग घेतला नाही, तर स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले. आमच्या पदकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे: ११ सुवर्ण पदक* (प्रत्येकी ₹११,०००/- रोख),१३ रौप्य पदक* (प्रत्येकी ₹९,०००/- रोख),२६ कांस्य पदक* (प्रत्येकी ₹३,५००/- रोख)
अपार कष्ट, शिस्त आणि कधीही न हार मानण्याच्या वृत्तीचे आज चीज झाले आहे. असेच कठोर परिश्रम करत राहा आणि यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करा!” अशी प्रतिक्रिया अकॅडमीचे संचालक तुषार पवार यांनी दिली.तसेच या यशामुळे शिवमुद्रा मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे.असेही ते म्हणाले.

या घवघवीत यशानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी आपल्या पाल्याच्या कामगिरीत संचलकांचे भरभरून कौतुक केले.
