किरण खुडे,

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): येथील भोपळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत ३५० बैलगाडे धावले. शर्यतीत अव्वल आणि फायनल स्पर्धेत अव्वल येणाऱ्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे तसेच वस्तु स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. अंतिम दौडीसाठी घाटात मोठी गर्दी झाली होती. सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या बैलगाडा घाटावर दोन दिवस शर्यती पार पडल्या. यावेळी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतून अनेक बैलगाडा मालक आणि नागरीक यावेळी उपस्थित होते.

गावचे मांडव डहाळे, शोभायात्रा काढून यात्रेची सुरुवात झाली. शनिवारी रात्री पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. अशी माहिती देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर यांनी दिली. बैलगाडा शर्यतीच्या फायनल साठी ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, नरेंद्र थिगळे, जिल्हा परिषदेचे गटनेते आणि बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, माजी सभापती विनायक घुमटकर, संचालक अशोक राक्षे, सुधीर भोमाळे, पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ व त्यांचे सर्व सहकारी तसेच खंडेराव थिगळे, समीर आहेर, अशोक दुगड आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *