किरण खुडे,

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजातील शोषित-वंचित घटकांचे तारणहार आणि समानतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा राजगुरूनगर बँकेचे संचालक विजय डोळस यांनी येथे केले.

राजगुरूनगर एसटी बसस्थानक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर उत्साहात साजरी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, स्थानक प्रमुख उत्तम लांडे, वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, सहायक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, भिमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश शिवशरण, बसपाचे जिल्हा प्रभारी रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) निता आल्हाट, जयंती उत्सव समिती अध्यक्ष मोहन गोपनारायण उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध लढण्यासाठी केला. त्यांनी समाजाला दिलेला सर्वात मोठा संदेश म्हणजे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या हक्कांसाठी उभे राहू शकत नाही. असेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सामुहीक बुद्धवंदना प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी अर्पिता आलट, विष्णू राठोड, प्रितेश किर्दक, अर्जुन वाघुले यांची भाषणे झाली

कार्यक्रमासाठी वरीष्ठ लिपीक स्नेहा कातोरे, क्रांती कांबळे, कैलास वाघमारे, अमित जगताप, राजेंद्र गुट्टे, अजिंक्य फलके, प्रशांत होले, विजय बुंदे, अविनाश आलट, रावसाहेब आडागळे, परशुराम साळवे, संतोष गायकवाड, रविंद्र राठोड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन एसटी कर्मचारी मोहन गोपनारायण, शिवाजी खलुले, राहुल पाटोळे आदी कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. तर आभार दत्ता गभाले यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *