पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच व्यक्तींना खराडी पोलिसांनी गजाआड करत त्या व्यवसायिकाची सुटका केली.
खराडी पोलीस ठाणे हद्दीत इराणी कॅफे हॉटेल समोर, खराडी येथुन खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याचा बहाणा करुन पुणे रेल्वे मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखाच्या खंडणीसाठी मोटारीतुन अपहरण करण्यात आल्याची ०५ इसमांविरुध्द मेट्रो ठेकेदार दिपक प्रदिप सिंग, वय ४० वर्षे रा गहुंजे, पुणे यांनी दिल्या नंतर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केल्याप्रमाणे निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, व खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय चव्हाण यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकातील स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
तपासात खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरात कौशल्यपुर्ण सीसीटीव्ही पाहणी केली असता गुन्हयातील मुख्य सूत्रधार सागर दत्ताञय झुरुंगे, वय ३९ वर्षे रा लोणीकंद याने तक्रारदार यांना त्याच्या पांढऱ्या रंगाच्या फॉच्र्च्यूनर वाहनात जबरदस्तीने बसवुन त्यांचे अपहरण करुन पुणे नगर रोडच्या दिशेने त्यांना घेउन गेल्याचे निदर्शनास आले व खडी क्रशर पॉईंट, जकात नाका, खराडी येथे सागर झुरुंगे याचेसह आणखी ०४ इसम यांनी त्यांचे कडील स्कॉर्पिओ वाहनामधुन येउन तक्रारदार यांना मारहाण व शिवीगाळ करुन त्यांना पुन्हा फॉर्च्यूनर वाहनात बसवुन तक्रारदारास लोणीकंद, शिक्रापुर, सणसवाडी, रांजणगांव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नेउन तक्रारदार व त्यांचे वडीलांना फोनवरुन ५० लाखांची खंडणी मागुन त्यांचे अपहरण करुन त्यांना सणसवाडी परिसरातील एका बांधकामाच्या साईटवर नेउन तेथे वाहनांची अदला बदल करुन तक्रारदारास पुन्हा फोर्ड इंडिव्हर या दुसऱ्या वाहनात बसवुन घेवुन फिरत असताना खराडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणा आधारे पेरणे स्तंभा समोरील मुख्य रस्त्यावर, पेरणे येथे नाकाबंदी लावुन ०५ जणांना वाहनासह ताब्यात घेवुन तक्रारदार यांची सुटका केली.
गुन्हयात १) सागर दत्ताञय झुरुंगे, वय ३९ वर्षे २) विजय सुरेश वाळुंज, वय ३८ वर्षे ३) राजु विजयकुमार सहाणे, वय ३२ वर्षे ४) रुपेश शिवाजी गावडे, वय ३८ वर्षे राहणार सर्व लोणीकंद ता हवेली जि पुणे ५) प्रकाश बाळासाहेब ऊर्फ बाळु राउत, वय ३४ वर्षे रा तुळापुर ता हवेली जि पुणे यांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तपासामध्ये २ फॉरच्युनर व १ स्कॉर्पिओ, १ मोबाईल फोन असा एकुण ४९,१०,०००/- रू. किं.चा. मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हयाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक, रविंद्र गोडसे हे करीत आहेत.
ही कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मनोजकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ४. श्रीमती प्रांजली सोनवणे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक, राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपुडे, साहेबराव गुंडाळे, सुरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी यांनी केली आहे.
