पुणे (हवेलीनामा वृतसमूह) विमानतळ पोलीसांनी एम.डी. ड्रग्ज विक्री करणा-या दोघां इसमाना गजाआड करत २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असणाऱ्या तपास पथकातील पोलीस शिपाई हरी पुंडे व लालु क-हे यांना माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ खराडी बायपास चौकातुन फॉरेस्ट पार्ककडे जाणारे रोडवर एक व्यक्ती एम.डी. ड्रग्ज विक्री करीता येणार आहे. याची माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांना कळविली असता त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यावर सापळा रचुन प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी वय ३७ वर्ष रा. ५३/५८ साईनाथ नगर, वडगावशेरी पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३.५९ ग्रॅम एम.डी. पावडर एक मोटार सायकल जप्त केली.

पोलीस कोठडी तपासामध्ये कौशल्यपुर्ण तपास केल्यावर उबेद अन्सार खान, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक रा. गायकवाड सोसायटी, फ्लॅट नंबर २०३, अमीना मंझिल, सय्यद नगर रेल्वे गेट जवळ, हडपसर, पुणे यास खुळेवाडी परिसरामध्ये ड्रग्ज विक्री करण्यासाठी आला असताना ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०४ ग्रॅम एम.डी. पावडर व एक स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली असुन, एकुण २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

ही कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०७ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर, यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी लालु कन्है, हरीप्रसाद पुंडे, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन मांजरे, राहुल जोशी, प्रशांत सुतार, सागर कासार, अंबादास चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *