पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) श्रीक्षेत्र थेऊर येथे अजित कृषी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मंडपा चे भूमिपूजन
श्री क्षेत्र थेऊर तालुका हवेली येथे आयोजित अजित कृषी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दि. ८ ते १२ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न
होत असून प्रदर्शनाच्या मंडपाच्या कामाचे शुभारंभ महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे माजी पंचायत समिती सदस्य हिरामण तात्या काकडे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन किशोरजी उंद्रे पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब मुरकुटे यशवंत माजी संचालक मारुती अण्णा कुंजीर यांच्या हस्ते व थेऊरचे माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर पाटील तसेच थेऊरचे माझी ग्रामपंचायत सदस्य वस्ताद विठ्ठल नाना काळे व विलास पैलवान कुंजीर गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन एकनाथ आप्पा काळे तसेच माझी चेअरमन रमेश आप्पा कुंजीर राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक मंचाचे राज्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण रामकृष्ण हरी पतसंस्थेचे संचालक दत्तात्रेय तांबे सामाजिक कार्यकर्ते गणेश रसाळ व सोमनाथ चव्हाण व यशवंत चे संचालक मोरेश्वर काळे गोरक्षनाथ काळे गोपीचंद काळे विशाल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
उद्घाटनावेळी
ज्येष्ठ नेते श्री हिरामण काकडे
यांनी मनोगत व्यक्त करताना
सांगितले की,हे प्रदर्शन हे स्वर्गीय श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने होत आहे हे महाराष्ट्रातील पहिले
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन असून आपल्या श्री क्षेत्र थेऊर येथे होत असल्याने सर्वानी यात सहभागी व्हा.विविध कंपन्या हजारो शेतकरी आणि ग्राहक एकाच छताखाली येत आहेत.यावेळी प्रदर्शनाचे आयोजक पै दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजित दादा पवार यांनी शेवटपर्यंत शेतकरी आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले.त्यांना हि आम्ही आमच्या कामातून आदरांजली अर्पण म्हणून हे कृषी
प्रदर्शन आहे. शेतकऱ्यांच्या
उन्नतीसाठी व शेतीच्या सर्वांगीण
विकासासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रत्यक्ष अनुभव, संशोधनाची दिशा आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याचे कार्य या माध्यमातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रदर्शनामुळे शेतकरी व विद्यार्थी यांच्यात थेट संवाद निर्माण होत असून आधुनिक शेती तंत्रज्ञान गावागावात पोहोचण्यास मदत होत आहे मा.स्व.अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे व शेतकरी हिताच्या भूमिकेमुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रदर्शनासाठी आतापर्यंत स्टॉलचे बुकिंग पूर्ण झाले असून अजूनही विविध स्टॉलचे नोंदणी कार्य सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योजक
व संस्था या प्रदर्शनात सहभाग नोंदवत आहेत. प्रदर्शनामध्ये नोंदवत आहेत. प्रदर्शनामध्ये विविध पिकांची आधुनिक लागवड पद्धती, सुधारित वाण व बियाणे, ठिबक व तुषार सिंचन व्यवस्था, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, शेती यंत्रसामग्री, पशुपालन, मत्स्यपालन तसेच कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, प्रात्यक्षिके आणि चित्रफितींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. घरगुती शेती उपाय, सेंद्रिय कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळत असून शेतीतील खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे प्रभावी मार्ग समजणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *