थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात ताकदवर व शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिल्याने या जिल्हा परिषद गटातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी आवाहन केले.
ते वाडेबोलाई येथील बोल्हाई माता मंदिर येथे भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार कविता विजय पायगुडे,पंचायत समितीची उमेदवारी कुशाल गोरख सातव,सूरज भालचंद्र चौधरी यांच्या प्रचार शुभारंभ करताना बोलत होते
बोल्हाई मातेच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर तेच उमेदवार निवडून येतात.यावेळी वाडेबोल्हाई गावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देत मोठी संधी मिळाली आहे.विजय पायगुडे सारखा काम करणारा सक्षम कार्यकर्ता आम्ही निवडून त्यांची पत्नी कविता पायगुडे यांना आम्ही उमेदवारी दिली.तसेच ९ हजार नागरिकांना स्वामी समर्थांचे दर्शन घडविणारा युवक कुशाल गोरख सातव असून गणात घरोघरी पोहोचणारा उमेदवार आहे.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे.त्यामुळे स्वामी समर्थांना सह सर्वांचा आशिर्वाद कुशालला मिळाल्याशिवाय राहणार नाही.तर लोकांमध्ये राहणारा लोकांची कामे करणारा सूरज चौधरी हाही लोकांच्या घरघरात पोहोचलेला आहे.फक्त आता कमळ चिन्ह पुन्हा पुन्हा मतदारांपर्यंत पोहोचवा,विजय आपलाच आहे.इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे.
तर अजितदादांचे योगदान महाराष्ट्रासाठी मोठे राहिले आहे.दादांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकत नसल्याचे सांगून अजितदादा यांना प्रदीप कंद यांनी भर सभेत श्रध्दांजली वाहिली.
श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथे केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता विजय पायगुडे,कुशाल गोरख सातव,सूरज भालचंद्र चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आई बोल्हाई मातेच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला.हा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रोहिदास ऊंद्रे,भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिप भोंडवे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव,वाडेबोल्हाई माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,माजी सरपंच संजयराव भोरडे,केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव,यशवंत कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल,भाजपचे उपाध्यक्ष प्रवीण काळभोर,पंचायत समितीचे माजी सदस्य शामराव गावडे,माजी सरपंच तथा बोल्हाई देवस्थान सल्लागार राजेंद्र चौधरी,वाडेबोल्हाई माजी आदर्श सरपंच दिपक गावडे,केसनंदचे माजी उपसरपंच पांडुरंग हरगुडे,युवा नेते प्रतापराव सातव,भाजपचे तालुकाध्यक्ष विजय जाचक,शिरसवडीचे उपसरपंच मंगेश गावडे,युवा नेते प्रदिप शिंदे,माजी उपसरपंच योगेश गायकवाड,मंगेश कानकाटे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे,माजी उपसरपंच सूरज भोरडे,माजी सरपंच सुजाता सावंत,ज्येष्ठ नेते विठठल गावडे,माजी सरपंच राजाराम सातव,माजी उपसरपंच हिरामण हरगुडे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे,सांगवी सांडसचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे,ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे,निळकंठ केसवड,माजी सरपंच वैशाली केसवड,प्रभारी सरपंच स्वाती इंगळे,राहुल शिंदे,सचिन कोतवाल,आदी विविध गावचे आजी,माजी सरपंच,उपसरपंच व मोठ्या संख्येत मतदार उपस्थित होते.यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना या सभेत सर्वांनी श्रध्दांजली वाहिली.
केसनंद गाव मतदार संख्येने मोठे असले तरी आमची पूर्व भागातील खालची गावेही महत्वाची आहे.राष्ट्रवादी पक्षाने पंचायत समिती व जिल्हा परिषदेचाही उमेदवार एकाच गावात व घरात दोन उमेदवारी दिल्याने केसनंद गावासह खालच्या गावांमधील जनता नाराज झाली आहे.बाकीच्या गावांची मते त्यांना नको आहेत.असे एकंदरीत वाटत असून यावेळी खालची गावे यावेळी त्यांना दाखवून देतील.व केसनंद सह खालील गावांची सर्वाधिक मतदान भाजपाच्या उमेदवारांनाच होणार असल्याची भावना व्यक्त करताना पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शामराव गावडे यांनी सांगितले.
