थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त महत्त्वाचे असलेल्या दोन प्रकल्प बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या तालुक्यातील दोन उडानपुल आणि रिंगरोड हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले. ते श्रीक्षेत्र थेऊर येथे थेऊर जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार सौ पुष्पलता प्रकाश सावंत थेऊर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा पंचायत समिती गणाचे उमेदवार योगेश काकडे आणि कोलवडी मांजरी आव्हाळवाडी गणाच्या उमेदवार सौ पूनम अशोक गायकवाड यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद होते विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच तर थेऊर,कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, कोलवडी, मांजरी आणि आव्हाळवाडी येथील अनेक वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी व हजारो नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

आमदार कुल म्हणाले राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार मोठ्या भक्कमपणे विकासात्मक काम करत असून शासनाच्या माध्यमातून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत हवेली तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे दोन प्रकल्प मंजूर झाले असून यासाठी शासनाकडून निधीही उपलब्ध झाला आहे लवकरच यासाठी कामकाजाला सुरुवात होईल यामध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूल यासाठी 550 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुणे नगर महामार्गावरील उन्नत पुलासाठी 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या दोन्हीही उन्नत पुलामुळे वाहतूक समस्या सुटणार असून नागरिकांना यापासून मुक्तता मिळणार आहे तसेच पुणे शहरा भोवती असलेल्या रिंग रोड या महत्वपूर्ण प्रकल्पातला मंजुरी मिळाली असून यासाठी शेतकऱ्यांना मोबदला दिला आणि हे प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण करण्याची सरकारची मानसिकता आहे तसेच मेट्रो प्रकल्प हा उरळीकांचन पुढे यवतपर्यंत वाढविण्याचाही प्रयत्न चालू असून यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले तर असे लोकाभिमुख प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच नदी शुद्धीकरण व मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या नागरिकीकरणा साठी पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी विशेष पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी काही प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत मुंबईप्रमाणेच पुण्याचाही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असून त्याच धर्तीवर शहर व जिल्ह्याचा विकास होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

“कारखान्यापासून रस्त्यापर्यंत आणि रस्त्यापासून पाण्यापर्यंत” सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वयक समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की थेऊरचा सर्वांगीण विकास होत असून अनेक प्रकल्प मार्गी लागत आहे थेऊर प्रमाणेच थेऊर जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांच्या विकास व्हावा यासाठी थेऊर जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या या तीनही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा त्याचबरोबर त्यांनी थेऊरमध्ये गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प यावरही भाष्य केले येथील पेशवे वाडा या ठिकाणी गेली पाच वर्षापासून भक्तनिवास बांधकाम चालू असून त्याची पूर्णता कधी होणार तसेच काकडे मळा तार मळा थेऊर या रस्त्याचे काम गेले दीड ते दोन वर्षापासून चालू असून ते काम पूर्ण होऊ शकलेले नाही शासनाकडून सर्व पूर्तता होऊन देखील ही कामे अपूर्णच आहेत यावर निवडणुकीनंतर आमदार राहुल कुल तसेच प्रदीप दादा कंद यांनी लक्ष घालावे असे त्यांनी सुचविले. याचबरोबर अनेकांच्या रोजी रोटीचा प्रश्न असलेला यशवंत सहकारी साखर कारखान्या संदर्भात निर्णय घेऊ हा कारखाना पूर्ववत चालू करावयासाठी आमदारांनी लक्ष घालावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही संस्था अतिशय महत्त्वाचे असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थांमधून अनेक प्रकल्प आणि उपाय योजना राबविल्या जातात यासाठी या संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले तसेच पक्षाच्या विचारधारेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दलही त्यांनी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी सरपंच नवनाथ काकडे यांनी सांगितले की एखादे नेतृत्व फुलत असताना त्या नेतृत्वात सर्वसामान्यांचे आशीर्वाद आवश्यक असतात आणि प्रश्न मार्गी लावायचे असतील तर योग्य नेतृत्व असले पाहिजे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून वरिष्ठ निर्णय घेत असतात आणि उमेदवारांची श्रीमंती ही जनसामान्य मतदार असते त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो असे त्यांनी नमूद केले.

प्रकाश सात सावंत यांनी आपल्या मनोगत सांगितले की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी गेल्या दोन तीन महिन्यापासून चालू केली मला कसल्याही मानपाण्याची हार तर याची आवश्यकता नाही आणि मी त्याचा कधी अपेक्षाही केलेला आहे जनसामान्यांची सेवा करण्याची अति इच्छा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्य करण्याची इच्छा आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे त्यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये उतरलो आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास गंगेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून या पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेतली संधीच सोन करून जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *