किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात देखील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. खेड तालुका सर्वपक्षीय व राजगुरुनगर व्यापारी महासंघातर्फे गुरुवारी (दि. २९) कडकडीत बंद ठेवून उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजगुरूनगर शहरासह तालुक्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
शहर बाजारपेठेसह सर्वदुर कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहर परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शासनाने तीन दिवस दुखवटा व शासकीय सुट्टी जाहीर केल्याने अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले तर गुरुवारीही सुट्टी देण्यात आली होती. शहरात रिक्षा वाहतुकीसह तुरळक वाहने दिसत होती. शहरातील सर्वच प्रकारची दुकाने बंद होती.केवळ मेडीकल स्टोअर्स सुरू होते. व्यापारी महासंघाचे स्वानंद खेडकर, विनय लोढा, माणिक होरे, नितिन शहा, प्रविण वायकर यांनी केलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
