थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर जिल्हा परिषद गणातील थेऊर जिल्हा पंचायत समिती गटात चुरशीची लढाई अनुभवास येणार असून थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवत या गणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे थेऊर पंचायत समिती गणात मोठ्या चुरशीची लढाई होणार असे चित्र दिसत आहे.

ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी गेल्या अनेक वर्षा त वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक व समाज उपयोगी कामे केली विशेष करून आरोग्य विषयक त्यांचे कार्य मोठे असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे या थेऊर गणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचे चित्र अनुभवास येत आहे. माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथची शिंदे यांचे स्वीय मंगेश चिमटे यांचे ते अत्यंत कनिष्ठ असल्याने मुख्यमंत्री सहायता निधी तथा आरोग्य कल्याण निधीमधून अनेक गोरगरीब जनतेसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला तसेच अनेक रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मदत केली यामुळे त्यांना “आरोग्यदूत” या उपाधीने अलीकडच्या काळात सर्वसामान्य जनता ओळखत आहे त्यांच्याकडून समाज उपयोगी कार्य व्हावे अशी सर्वसामान्य इच्छा आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात युवराज काकडे यांनी आपल्या पत्नी सौ पल्लवी काकडे यांच्या जिल्हा परिषद या पदासाठी उमेदवारी जाहीर करून प्रचार ला सुरुवात केली होती परंतु प्रत्यक्ष उमेदवारी अर्जदार दाखल करताना यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत युवराज काकडे यांनी स्वतः पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या थेऊर पंचायत समिती गणात निवडणूक मोठ्या चुरशीची होणार हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *