पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) महाराष्ट्राचा बुलंद आवाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डीजीसीए यांनी केली आहे.
आज ते सकाळी मुंबईवरून बारामतीकडे विमानाने निघाले होते बारामती या ठिकाणी लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांच्यासह सहा जणांचा या विमाना अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे यामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार सारखा करारी नेता अशा विमान अपघातामधून गेल्याची हळूहळू सर्वच स्तरांमध्ये व्यक्त होत आहे
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर प्रचंड पकड असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या ह्या अशा अचानक जाण्याने सर्वच जण स्तब्ध हतबल झालं आहे अत्यंत कर्तृत्ववान व धोरणी असा हा राजकारणी म्हणून अजित दादाची ओळख,
एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्र अनुभव आहे. दादांच्या अशा जाण्याने एक प्रचंड राजकीय सुनामी आल्याचे चित्र राज्या दिसून येत आहे.
