किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन राजगुरुनगर शहरात उत्साही वातावरणात साजरा झाला. शहराच्या वेशीवर व नगरपरिषद कार्यालयात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नगरपरिषदेने आरोग्य विभागासाठी घेतलेले शहरातील रस्ते साफसफाई करण्याचे नवीन स्वीपिंग यंत्र ( साफसफाई मशीन ) गाडीचे लोकार्पण नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते करण्यात आले
या स्वीपिंग मशीन गाडीमुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते स्वच्छ होणार आहेत, असे यावेळी बोलताना मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.
तसेच यावेळी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत प्राईडसिटी वाडा रोड आणि तिन्हेवाडी रोड तांबेवस्ती या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी बांधली असून या टाक्यांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या वॉलमन रूमचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक आश्विनी आवटे, सुप्रिया घुमटकर, फैज मोमीन, वैभव घुमटकर, मित्रसेन डोंगरे, कुमार सांडभोर, सचिन मधवे, सागर सातकर, निलेश घुमटकर, अमित घुमटकर आदी उपस्थित होते.
