थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दोन टप्प्या प्रमाणेच महायुतीतील सहयोगि पक्षात लढत पहावयास येत असून ग्रामीण भागात जेथे भाजप साठी मोठे आव्हान असलेले दिसते परंतु यावेळी हवेलीतील चित्र अतिशय विलक्षण बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढाई असली तरीही प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच रणनीती दिसते. भाजपकडे आयत्यावेळी पक्ष प्रवेश करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही संस्थामध्ये मोठी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

मांजरी खुर्द येथील उद्योजक प्रकाश सावंत यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस कडून उमेदवारी डावलल्याने ही निवडणूक लढविण्याचे ठरवले सर्व सहकारी कार्यकर्यांनी एकमुखी पाठिंबा दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या सहकारी पंचायत समिती लढवू इच्छिणाऱ्या योगेश काकडे आणि पूनम गायकवाड यांच्यासह निवडणुकीत जोरदार एंट्री केली. यामुळे कार्यकर्त्यांना मोठे नवचैतन्य मिळाले. या गटात या राजकीय गणितामुळे रंगत वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे आव्हान उभे ठाकले आहे. निवडणूक प्रचार जसजसा रंगात येईल तसे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. हवेलीतील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागेपैकी किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे 7 फेब्रुवारी रोजी करणार आहे येत्या निवडणूक प्रचारामध्ये डाव प्रति डाव रंगणार असून स्थानिक मुद्द्यांवर चर्चा होणार हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *