थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर – कदमवाकवस्ती – वडकी, थेऊर – आव्हाळवाडी, उरुळी कांचन – सोरतापवाडी, कोरेगाव मूळ – केसनंद आणि पेरणे या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठया रंगतदार घडामोडी घडल्या आणि राजकीय डाव प्रतिडावाचा खेळ रंगल्याने येणाऱ्या निवडणूक प्रचारात चांगलीच रंगत वाढणार आहे.

पूर्व हवेलीत सर्वाधिक सुरशीची लढाई थेऊर आव्हाळवाडी या जिल्हा परिषद गटात अनुभवास मिळणार आहे कारण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या गटामध्ये मोठी राजकीय खेळी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारीसाठी मागणी करून देखील उमेदवारी न मिळाल्याने मांजरी खुर्द येथील उद्योजक प्रकाश सावंत व त्यांचे सहकारी पंचायत समिती साठी इच्छुक असलेले थेऊर गणातील योगेश काकडे तसेच कोलवडी मांजरी आव्हाळवाडी या गणासाठी इच्छुक असणाऱ्या पूनम गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत या पक्षाची उमेदवारी मिळवली यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक ही मोठी रंगतदार होणार हे निश्चित झाले या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषदेसाठी कोमल आव्हाळे तर थेऊर पंचायत समिती गणासाठी युवराज काकडे तर कोलवडी मांजरी आव्हाळवाडी या गणासाठी सुषमा मुरकुटे यांना उमेदवारी मिळाल्याने ही तुल्यबळ लढत होणार असे मतदारांना वाटते.

कोरेगाव मूळ केसनंद या जिल्हा परिषद गटामध्ये कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात असलेले पेठ गावचे आदर्श सरपंच सुरज चौधरी यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली त्यामुळे हे नाराजी नाट्य राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडणार का हा येणारा काळ ठरवणार आहे.

पूर्व हवेलीतील बहुतेक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देताना खूपच सावधानी राखली गेली असली तरीही अनेक इच्छुक उमेदवार मात्र नाराज झाल्याने या गटांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत नेमकी किती यश पदरी पडते याकडे संपूर्ण मतदारांचे लक्ष लागले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा अहिरभावात असलेल्या उमेदवारांना आयत्यावेळी डावलल्याने मोठा भ्रमनिरास झाला अर्थात त्यांनी ही निवडणूक लढविण्याचे मनस्वी ठरविल्याने मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे आता निवडणूक प्रचार जसा जसा रंगाला येईल तसतसे नवनवीन मुद्दे हे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांवर डागणार हे अनुभवास येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *